Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहे.
मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय घेतलेला असून मनोज जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
मात्र, तरीही मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या नाही तर उपोषण सुरूच राहणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
We want to work for the welfare of the Maratha community – Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, “आपल्याला मराठा समाजाच्या कल्याणासाठी काम करायचं आहे. कुणी कितीही बोलू द्या, माझं उपोषण सुरूच राहणार आहे. आपल्याला आंदोलनादरम्यान कुणालाही हानी होऊ द्यायची नाही.
आम्हाला एक पत्र द्या. त्यामध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या नाही तर आमचं उपोषण सुरूच राहील. 2004 मध्ये जो जीआर काढण्यात आला होता, त्यामध्ये सुधारणा करून मराठा समाजाला तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावं.
ज्यांची चौकशी झाली पाहिजे ते मुंबईत खुलेआम फिरताना दिसत आहे. आमच्या आंदोलनादरम्यान माठीमारचे आदेश देणाऱ्या एसपीवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.”
दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “काल रात्री उशिरापर्यंत राज्य शासनाची मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये मी जास्त माहिती घेतली नाही.
कारण मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधत होते. या प्रकरणावर राज्य सरकारने जो जीआर काढला आहे तो जरांगे यांना मान्य नाही.
त्यामुळे राज्य सरकारने आज जरांगे त्यांच्या भेटीला आपलं शिष्टमंडळ पाठवलं आहे. आम्ही मनोज जरांगे यांना समजण्यात कमी पडत आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | ओबीसींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये – विजय वडेट्टीवार
- Ajit Pawar | राज्य सरकार मनोज जरांगेंना समजवण्यात कमी पडतंय – अजित पवार
- Sanjay Raut | G-20 परिषद आहे की मोदी 20-20 आहे? – संजय राऊत
- Sadabhau Khot | मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली – सदाभाऊ खोत
- Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे