Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह राज्य सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला होता.
या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दाखवली होती. अशात पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
गणेश उत्सवापूर्वी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या उर्वरित चौथ्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग धरला आहे.
In this cabinet expansion, 14 people can take oath as ministers
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या चौथ्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
गणेश उत्सवापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तब्बल 14 जण मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
याबाबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांची नुकतीच बैठक झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये नक्की कोणाची वर्णी लागते? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) मंत्री पदासाठी उत्सुक असून त्यांनी त्यांची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दाखवली होती.
त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्र पद नको असल्याचं म्हटलं होतं. या सर्व घटनानंतर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार का? हे पाहणं आता उत्सुकतेच राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा समाजाने माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नये – मनोज जरांगे
- Ajit Pawar | ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? – प्रकाश शेंडगे
- Narendra Modi | PM मोदींसमोरील G-20 परिषदेतील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय आहे प्रकरण?
- Maratha Reservation | मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या नाही तर उपोषण सुरूच राहणार – मनोज जरांगे
- Vijay Wadettiwar | ओबीसींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये – विजय वडेट्टीवार