Sanjay Raut | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 14 दिवसांपासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करत आहे. आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक टीका केली आहे. तंत्र-मंत्र, जादूटोणा, तीर्थयात्रा यामध्ये मुख्यमंत्री शिंदे अडकलेले आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. यावर बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारायला हवं.
काल मुख्यमंत्री शिंदे G-20 ला हजर होते. आज ते भीमाशंकरला गेले आहे. तंत्र-मंत्र, जादूटोणा, तीर्थयात्रा यामध्ये मुख्यमंत्री शिंदे अडकलेले आहे.”
Hinduism has always taken a reformist path – Sanjay Raut
यावेळी बोलत असताना त्यांनी (Sanjay Raut) भारतीय जनता पक्षावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाशी काही घेणं-देणं नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. हा फक्त सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे.
देशातील जनतेचं देखील आता हेच मत होत चाललं आहे. दंगली घडून आणायच्या, जातीय तेढ निर्माण करायची, इंडियाचं भारत करायचं याला हिंदुत्व म्हणता येणार नाही.
हिंदुत्व एक संस्कार आहे. हिंदुत्व एक संस्कृती आहे. हिंदू धर्माने नेहमी सुधारणावादी मार्गाचा स्वीकार केला आहे. हा धर्म आतापर्यंत सर्वांना सोबत घेऊन पुढे गेला आहे.
त्याचबरोबर हिंदू धर्म लोकशाही मानणारा आहे. जर तुम्ही हे सगळं संपवून टाकलं आहे तर तुम्हाला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | ठाकरे आणि शिंदेंचे आमदार चिंतेत; ‘या’ दिवशी होणार आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी
- Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? CM शिंदेंनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक
- Uddhav Thackeray | मोदींच्या लुच्चेगिरीची 9 वर्ष देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल
- Cabinet Expansion | राजकीय हालचालींना वेग; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?
- Maratha Reservation | मराठा समाजाने माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नये – मनोज जरांगे