Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पॅरिसमध्ये बोलत असताना भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली होती.
भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.
राहुल गांधींच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस नेत्यांची कल्पनाशक्ती जिथे थांबते, तिथे मोदींची (Narendra Modi) सुरू होते, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
Does Rahul Gandhi have any right to talk about Hindutva? – Keshav Upadhye
ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का?
परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे, मोदीजींची दूरदृष्टी आणि हिंदुत्व राहुलजींना कधीच कळणार नाही.
काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी मोदीजींची कल्पनाशक्ती सुरू होते, यातच काय ते आले. राहुल गांधीनी पॅरिसमध्ये जाऊन आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल म्हणे माहिती दिली.
‘भारत’ शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन ‘भारत जोडो’ म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? ‘इंडिया जोडो’ म्हणा ना!”
मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का? परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे,
मोदीजींची दूरदृष्टी आणि हिंदुत्व राहुलजींना कधीच कळणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या… pic.twitter.com/Mq4M3yYCKL
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 11, 2023
दरम्यान, राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मी गीता आणि उपनिषदे वाचले आहे. त्याचबरोबर मी अनेक हिंदू ग्रंथांचं वाचन केलं आहे. त्यातून मला असं समजलं आहे की भाजपचं आचरण हिंदू धर्माप्रमाणे अजिबात नाही.
एखाद्या व्यक्तीला भीती दाखवून कमजोर करायचं, त्याला इजा पोहोचवायची, त्याचं नुकसान करायचं, असं एकाही हिंदू धर्मग्रंथात मी वाचलं नाही.
हिंदू राष्ट्रवाद हा विचार आणि शब्द अत्यंत चुकीचा आहे. ते राष्ट्रवादी अजिबात नाही. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | CM शिंदे जादूटोणा, तीर्थयात्रा यामध्ये अडकलेय – संजय राऊत
- Eknath Shinde | ठाकरे आणि शिंदेंचे आमदार चिंतेत; ‘या’ दिवशी होणार आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी
- Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? CM शिंदेंनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक
- Uddhav Thackeray | मोदींच्या लुच्चेगिरीची 9 वर्ष देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल
- Cabinet Expansion | राजकीय हालचालींना वेग; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?