Share

Chandrashekhar Bawankule | ओबीसी आणि मराठा दोघांच्या हक्कांवर गदा येणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

🕒 1 min readChandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाचं जालना जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 14 दिवसापासून उपोषण करत आहे. यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येत असल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाचं जालना जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 14 दिवसापासून उपोषण करत आहे.

यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येत असल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The government is trying to give full reservation to the Maratha community – Chandrashekhar Bawankule

प्रसार माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पूर्णपणे न्याय आणि हक्क देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

मराठा समाजाला पूर्णपणे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दोन समाजांमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही. मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांचे भाऊ आहेत.

त्यामुळे दोन्ही भावांमध्ये वाद घडवून आणणं योग्य नाही. सरकार अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. सरकार ओबीसी आणि मराठा दोघांच्याही हक्कांवर गदा येऊ देणार नाही.”

दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलकांना समजावण्यात आम्ही कमी पडत असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही कमी पडलो, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र येऊन आरक्षणाचा विषय लावून धरला पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.

त्यांनी गोरगरिबांचं कल्याण करायला हवं. आमचा आक्रोश त्यांच्या लक्षात येत असेल. मराठा समाजाला आरक्षण द्या, एवढीच आमची मागणी आहे.

सर्वपक्षीय नेते गोळा करून अजित पवारांनी गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा. आम्हाला जर आरक्षण मिळालं  तर आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक होऊ. आमची मागणी पूर्ण झाली तर आम्ही तुमच्यासमोर नाक घासायला देखील मागे-पुढे पाहणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!