Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये चांगला तापला आहे. आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाज आंदोलन करत आहे.
उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. अशात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा समाजाने निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
The state government supports the Maratha community – Eknath Shinde
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “राज्य सरकारचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. त्याचबरोबर आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे.
मात्र, यासाठी आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाला देखील विनंती करणार आहोत.
शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करण्याचं काम सुरू आहे. या सर्व कारवाईला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाने आम्हाला थोडा वेळ द्यायला हवा.”
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.
आज माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ओबीसी किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे.
मराठा समाजाला दिलं जाणाऱ्या आरक्षणामध्ये कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच आम्ही आजची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो.”
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | ओबीसी आणि मराठा दोघांच्या हक्कांवर गदा येणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन; म्हणाले…
- Keshav Upadhye | काँग्रेस नेत्यांची कल्पनाशक्ती जिथे थांबते, तिथे मोदींची सुरू होते – केशव उपाध्ये
- Sanjay Raut | CM शिंदे जादूटोणा, तीर्थयात्रा यामध्ये अडकलेय – संजय राऊत
- Eknath Shinde | ठाकरे आणि शिंदेंचे आमदार चिंतेत; ‘या’ दिवशी होणार आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी