Share

Devendra Fadnavis | आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी होईल, असा ओबीसीने गैरसमज करू नये – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. अशात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आरक्षणात कोणी वाटेकरी होईल, असा गैरसमज ओबीसींनी करू नये, असं देवेंद्र … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. अशात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येत आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आरक्षणात कोणी वाटेकरी होईल, असा गैरसमज ओबीसींनी करू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

OBC community should not misunderstand about reservation – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आरक्षणाबाबत ओबीसी समाजाने कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

ओबीसींच्या मनात भीती आहे की आमचं आरक्षण काढून घेतलं जाणार किंवा त्यामध्ये कोणीतरी वाटेकरी होणार. परंतु, असं काही होणार नाही.

त्यामुळे यावर वक्तव्य करत असताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असा कोणताच निर्णय राज्य शासन घेणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि हीच आमची स्पष्ट भूमिका आहे.

मराठा समाजाला दिलं जाणाऱ्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असं मी त्यांना आवाहन करतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही