🕒 1 min read
Devendra Fadnavis | नागपूर: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी पक्ष विद्यमान सरकार लोकांचं हित साधणारं असल्याचा जोरदार प्रचार करताना दिसतं.
सध्याचं सरकार जनसामान्यांचं आहे. त्याचबरोबर महायुतीचं सरकार जनसेवेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहे, हे सांगण्याची सत्ताधारी पक्ष एकही संधी सोडत नाही. अशात देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या विषयाकडं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्याचं सरकार लोकांची कामं करणारं सरकार आहे. सध्याचं सरकार लोकांचं काम अडवणारं सरकार नाही, असं म्हणतं देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध विभागातील काम एकाच ठिकाणी व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरू केला आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वीच्या काळी विविध शासकीय विभागांमध्ये लोकांना काम करण्यासाठी विनाकारण चकरा मारायला लागायच्या.
त्याचबरोबर शासकीय काम करण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करायला लागायचा. मात्र, आता तसं होत नाही. कारण सध्याचं सरकार लोकांची कामं करणारं सरकार आहे. सध्याचं सरकार लोकांचं काम अडवणारं सरकार नाही.”
There will be no injustice to the OBC community – Devendra Fadnavis
दरम्यान, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापलेला आहे. अशात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “ओबीसीच्या मनात भीती आहे की आमचं आरक्षण काढून घेतलं जाणार किंवा त्यामध्ये कोणीतरी वाटेकरी होणार. परंतु, असं काही होणार नाही. ओबीसीने आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असा कोणताच निर्णय राज्य शासन घेणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | भाजपचा मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्लॅन – नाना पटोले
- Maratha Reservation | मराठा आरक्षण हाच माझा उपचार – मनोज जरांगे
- Girish Mahajan | थोड्यादिवसांनी उद्धव ठाकरेंसोबत कुणीही राहणार नाही – गिरीश महाजन
- Devendra Fadnavis | आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी होईल, असा ओबीसीने गैरसमज करू नये – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | मराठा समाजाने निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











