Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे.
आंदोलनाच्या चौदाव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. अशात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीपूर्वी मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण हाच माझा उपचार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange has also stopped taking medicine and water since yesterday
गेल्या चौदा दिवसापासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करत आहे. राज्य शासनाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज्य शासनाचे सर्व प्रयत्न असफल ठरले आहे.
आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्याचबरोबर जरांगे यांनी कालपासून औषध आणि पाण्याचं सेवन करणं देखील बंद केलं आहे.
उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली होती. त्यांनी काल सलाईन देखील काढलं आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी साडेसहा वाजता सह्याद्री अतिथी गृह या ठिकाणी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीला ठाकरे गटाकडून विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाकडून राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan | थोड्यादिवसांनी उद्धव ठाकरेंसोबत कुणीही राहणार नाही – गिरीश महाजन
- Devendra Fadnavis | आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी होईल, असा ओबीसीने गैरसमज करू नये – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | मराठा समाजाने निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे – एकनाथ शिंदे
- Chandrashekhar Bawankule | ओबीसी आणि मराठा दोघांच्या हक्कांवर गदा येणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन; म्हणाले…