Share

Sambhaji Bhide | मराठा समाजाला शंभर टक्के योग्य ते आरक्षण मिळणार – संभाजी भिडे

Sambhaji Bhide | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी शिवस्वराज प्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहे. उपोषण स्थळी दाखल होतच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा समाजाला शंभर टक्के योग्य ते आरक्षण मिळणार, … Read more

Published On: 

Sambhaji Bhide | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे.

उपोषणाच्या पंधराव्या दिवशी शिवस्वराज प्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहे. उपोषण स्थळी दाखल होतच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा समाजाला शंभर टक्के योग्य ते आरक्षण मिळणार, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

We will stand by Manoj Jarange – Sambhaji Bhide

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, “आम्ही मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून एवढ्या चांगल्या नेतृत्वाचं सरकार राज्यामध्ये नव्हतं, असं माझं मत आहे.

सध्याचं सरकार शब्द पाळणारं आहे. ते मराठा समाजाला आरक्षण देतील. मनोज जरांगे यांचं आंदोलन यशस्वी ठरेल. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही मनोज जरांगे यांच्यासोबत आहोत.

मनोज जरांगे हे आंदोलन स्वतःसाठी करत नाही. त्यांचं हे आंदोलन समाज कल्याणसाठी आहे. त्यांच्या इच्छाशक्तीचं कौतुक करायला शब्द नाही.

या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठी चार्ज मागे हे तिघंजण (मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री) नाही. लाठी चार्ज करा, असं म्हणणारे सध्याचे राज्यकर्ते नाही.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवाव यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जरांगे यांना कळकळीची विनंती केली आहे.

ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे.

तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि निस्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल.

त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा व कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी ही कळकळीची विनंती.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही