Share

Rohit Pawar | मनोज जरांगेंनी आपले उपोषण मागे घ्यायला हवे; रोहित पवारांची जरांगेंना कळकळीची विनंती

🕒 1 min readRohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जरांगे यांना एक कळकळीची विनंती केली आहे. मनोज जरांगे यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे.

उपोषणाच्या पंधराव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जरांगे यांना एक कळकळीची विनंती केली आहे. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागं घ्यायला हवं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Today is the 15th day of Manoj Jarange fast

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे.

त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि निस्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल.

त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा व कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी ही कळकळीची विनंती.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचे एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं देखील या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो फॉर्मुला वापरला होता तोच फॉर्मुला सध्याचं सरकार वापरणार असल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!