Share

Maratha Reservation | आरक्षण पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही – मनोज जरांगे

Maratha Reservation | जालना: गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर आज सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची प्रत मनोज जरांगे यांना अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट … Read more

Published On: 

Maratha Reservation | जालना: गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

त्यानंतर आज सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची प्रत मनोज जरांगे यांना अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

I always work transparently – Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “मी नेहमी पारदर्शकपणे काम करतो. मी तुमच्यापुढे अजिबात जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणताही पाऊल उचलणार नाही.

सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. या ठरावाची एक प्रत मला सोपवण्यात आली आहे.

आपण सर्व एकत्र आल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र, आरक्षणाचं पत्र सर्वसामान्य मराठ्यांच्या हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.”

दरम्यान, आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे उपोषण स्थळी दाखल झाले आहे. यानंतर संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

त्यांच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे म्हणाले, “आज संभाजी भिडे यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे. एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसऱ्याचा नाकारायचा हे आमचं धोरण नाही.

त्यांच्या पाठिंब्यानंतर आमची ताकद वाढली आहे. कुणीही आलं तरी आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणार आहोत. त्यामुळे आमची ताकद वाढणार आहे. सध्या आमच्यासाठी भावना नाही तर आरक्षण (Maratha Reservation) महत्त्वाचं आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही