Nitesh Rane | कुठल्याच बाजूने उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र वाटत नाही – नितेश राणे

Nitesh Rane | मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

कुठल्याच बाजूने उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) पुत्र वाटत नाही. उद्धव ठाकरेंना मुंबईतील कचऱ्यातून उचलून ठाकरे आडनाव दिलं आहे का?

त्यांचे विचार आणि गुण पाहता त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Is Uddhav Thackeray really Balasaheb Thackeray’s son? – Nitesh Rane

पत्रकार परिषदेत बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे खरंच बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे का? उद्धव ठाकरे यांचे विचार आणि गुण पाहता त्यांची डीएनए तपासणी करण्याची गरज आहे.

राम मंदिर आणि हिंदू धर्माबाबत होणाऱ्या वक्तव्याला आणि काँग्रेसला उद्धव ठाकरे ज्याप्रकारे पाठिंबा देत आहे. हे सर्व बघितल्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र होऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांचा जन्म ठाकरे यांच्या घराण्यात होऊ शकत नाही, असं वाटायला लागतं.”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व संकटांना सामोरे गेले होते.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे राम मंदिर येथे जाणाऱ्या भक्तांच्या बस आणि ट्रेनमध्ये दंगल होईल, असं म्हणतं आग लावत आहे. उद्धव ठाकरे हातवारे करून दुसऱ्यांच्या शरीराचं विश्लेषण करतो.

मात्र, त्याआधी त्यांनी स्वतःच शरीर बघायला हवं. त्यांना उभं राहिला दोन माणसं लागतात. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या शरीरावर बोलणं थांबवायला हवं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.