Abdul Sattar | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगाव जिल्ह्यामध्ये नुकतीच जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.
उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यांच्या या टीकेला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उठाव करणारे फुगे नाही तर योद्धा असतात, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
50 of us did the uprising together – Abdul Sattar
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, “ज्यांची सत्ता गेली आहे. त्यांना अर्थात वाईट वाटणारच. आम्ही उठाव केल्यामुळे त्यांची पद गेली आहेत.
आम्ही 50 लोकांनी मिळून उठाव केला होता. जी 40 लोकांची टीम आहे आणि त्यामध्ये 10 अपक्ष आमदार आहे. परिवर्तन घडवून आणणाऱ्यांना फुगे म्हणता येणार नाही. कारण उठाव करणारे फुगे नाही तर योद्धा असतात.”
जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. यावेळी बोलत असताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“लाठीचार्ज घडवून आणण्याचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही. त्यावेळी त्या ठिकाणी नक्की काय परिस्थिती निर्माण झाली असेल ते फक्त पोलिसांनाच माहित आहे”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan | उद्धव ठाकरेंच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल – गिरीश महाजन
- Ajit Pawar | विकासाचं सोडून काही जण बेताल वक्तव्य करतात; अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? जरांगेंचं उपोषण एका महिन्यासाठी मागे
- Maratha Reservation | आरक्षण पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही – मनोज जरांगे
- Nitesh Rane | कुठल्याच बाजूने उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र वाटत नाही – नितेश राणे