Girish Mahajan | उद्धव ठाकरेंच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल – गिरीश महाजन

Girish Mahajan | जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावं लागेल असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray needs to maintain some balance while speaking – Girish Mahajan

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या व्यंगावरून त्यांच्यावर टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर आज गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे. गिरीश महाजन म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यंगावर प्रतिक्रिया दिली होती.

परंतु, उद्धव ठाकरे यांच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना विचार करण्याची गरज आहे.

त्यांच्याकडे सध्या काहीही राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आता हळूहळू सरकायला लागली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहे. मात्र, त्यांना बोलताना जरा तोल सांभाळून बोलण्याची गरज आहे.”

दरम्यान, या कार्यक्रमात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले, “काहीजण बेताल वक्तव्य करत असतात.

आम्हाला त्यांच्याप्रमाणे टीका करता येत नाही का? आम्ही देखील वाभाडे बाहेर काढू शकतो. मात्र, यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही. त्याचबरोबर यातून रोजगार मिळणार नाही.

आम्ही कुठेही गेलो तरी विकास कामांबद्दलच बोलत असतो.  काहींना फक्त नौटंकी आणि नाटकं करता येतात. मात्र, यातून जनतेचं आणि राज्याचं भलं होणार नाही.”

महत्वाच्या बातम्या