Sanjay Raut | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.
आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहे.
एक महिना ते उपोषण स्थळीत राहणार आहे. एक महिन्यानंतर आंदोलन मागे घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
There is no relationship of trust with the state government – Sanjay Raut
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राज्य सरकारसोबत विश्वासाचं नातं राहिलेलं नाही.
पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर 24 तासात मराठ्यांना आरक्षण देऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.
मग ते आता मराठ्यांना आरक्षण का देत नाही? मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. कारण राज्य सरकारवर कुणी विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी नुसते आश्वासनाचे फुलबाजी उडवलेले आहेत. त्यांचे ते फुलबाजी आता विझले का?”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी आपले प्राण पणाला लावले आहे. मात्र, सरकार त्यांच्यावर उपोषण मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. कारण 16 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक आहे.
त्या बैठकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून सरकारचं जरांगे यांना गुंडाळण्याचं काम सुरू आहे. मात्र, मनोज जरांगे गुंडाळले जाणार नाही, हे मी वारंवार सांगत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालन्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या
- Uddhav Thackeray | मिंधेंच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काही चाड उरली आहे का? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Abdul Sattar | उठाव करणारे फुगे नाही तर योद्धा आहे; अब्दुल सत्तारांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- Girish Mahajan | उद्धव ठाकरेंच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल – गिरीश महाजन
- Ajit Pawar | विकासाचं सोडून काही जण बेताल वक्तव्य करतात; अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका