Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन करत आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या होत्या. यानंतर मराठा समाजाने राज्य सरकारला धारेवर धरलं होतं.
मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मराठा समाजाने म्हटलं होतं. यानंतर सरकारने मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले होते. परंतु त्यानंतर प्रकृती खालवल्यामुळे मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागं घ्यावं लागलं आहे.
Manoj Jarange will be at the protest site next month
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं. पण तब्येत खालावल्यामुळे त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं आहे. उपोषण मागं घेतलं असलं तरी मनोज जरांगे पुढचा महिना आंदोलनस्थळीच असणार आहे.
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, म्हणून ते आग्रही आहे. यासाठी पुढचा महिना ते साखळी उपोषण करणार आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण घ्यावं, यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला एक महिन्याचा वेळ दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमची मागणी पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. एक महिन्यानंतर आंदोलन मागे घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपोषण स्थळी उपस्थित रहावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मिंधेंच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काही चाड उरली आहे का? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Abdul Sattar | उठाव करणारे फुगे नाही तर योद्धा आहे; अब्दुल सत्तारांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- Girish Mahajan | उद्धव ठाकरेंच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल – गिरीश महाजन
- Ajit Pawar | विकासाचं सोडून काही जण बेताल वक्तव्य करतात; अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? जरांगेंचं उपोषण एका महिन्यासाठी मागे