लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. औसा मतदारसंघातील खरोसा शिवारात त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका भावूक झालेल्या शेतकऱ्याला मिठी मारून त्यांनी धीर दिला.
लातूर जिल्ह्यात यंदा केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेत, १९७२ नंतरचा हा सर्वात मोठा दुष्काळ असल्याचे सांगत फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली. तसेच, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. “कायदा म्हणून पंचनामा करतोय, पण मदत सरसकट करू. या संकटात तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा दिलासा त्यांनी (Devendra Fadnavis) दिला.
आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा आणि इतर सहा गावांतील पाणीपुरवठा योजना वीज बिलाच्या थकबाकीमुळे बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर, शासनाकडून थकीत बिलाचा भरणा करून ही योजना तातडीने सुरू केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोणी ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये; मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार
- TRAI चा मोबाईल ग्राहकांना दिलासा; इंटरनेट डेटाविना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक
- मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करा, SIR प्रक्रिया थांबवा; आयोगातील फुटीनंतर कपिल सिब्बल यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











