Share

TRAI चा मोबाईल ग्राहकांना दिलासा; इंटरनेट डेटाविना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट डेटाविना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे अल्प मुदतीचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

Published On: 

TRAI New Rules: कॉलिंग, SMS चे स्वस्त प्लॅन बंधनकारक

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ग्राहकांना मोठा दिलासा देत, इंटरनेट डेटाविना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा असलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे टेलिकॉम कंपन्यांना बंधनकारक केले आहे. या नव्या नियमांमुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) सारख्या कंपन्या ग्राहकांना डेटा असलेले महागडे प्लॅन घेण्याची सक्ती करू शकणार नाहीत.

नव्या नियमांनुसार, टेलिकॉम कंपन्यांना आता ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचे केवळ ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन उपलब्ध करून द्यावे लागतील. तसेच, असा किमान एक प्लॅन देणे बंधनकारक असेल जो दर महिन्याला एकाच ठराविक तारखेला आपोआप रिन्यू होईल. एखाद्या महिन्यात ती तारीख नसल्यास (उदा. ३१ तारीख), हा प्लॅन महिन्याच्या शेवटच्या दिवशी रिन्यू होईल. या बदलामुळे ग्राहकांची २८ दिवसांच्या रिचार्ज सायकलच्या कचाट्यातून सुटका होणार आहे.

यापूर्वीही ट्रायने व्हॉइस-ओन्ली प्लॅन देण्याचे निर्देश दिले होते; मात्र कंपन्यांनी ते प्रामुख्याने ८४ किंवा ३६५ दिवसांच्या दीर्घ मुदतीसाठीच ठेवले होते. यामुळे कमी कालावधीसाठी रिचार्ज करणाऱ्यांची अडचण होत होती. आता अल्प मुदतीचे स्वतंत्र प्लॅन आल्याने ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील ग्राहक आणि केवळ ओटीपी, बँकिंग किंवा सरकारी सेवांसाठी दुसरे सिम कार्ड वापरणाऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. ग्राहकांना लवकरच हे नवीन प्लॅन संबंधित कंपन्यांच्या अधिकृत ॲप आणि वेबसाइटवर पाहता येतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही