Share

मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढणार? कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी दाखल तक्रारीची कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत

Published On: 

Manoj Jarange hunger strike

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे केलेल्या एका कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीची कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश तिवारी यांनी तक्रारदाराला पुराव्यासह न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

ॲड. रत्नाकर चौरे यांनी ‘पार्टी इन पर्सन’ अंतर्गत हा फौजदारी पुनरिक्षण अर्ज दाखल केला आहे. या अर्जात राज्य शासन आणि मनोज जरांगे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी रोजी मंगळवेढा येथील एका सभेमध्ये जरांगे यांनी एका विशिष्ट जातीसमूहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांच्याविरोधातील तक्रारीवर न्यायालयात सुनावणी

या कथित वक्तव्यातून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोप करत तक्रारदाराने 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर पोलीस आयुक्तालयात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. 13 एप्रिल रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा अर्ज निकाली काढला होता. क्षेत्राधिकाराबाहेरील पोलिसांना तपासाचे निर्देश देण्याचा अधिकार नसल्याचे निरीक्षण त्यावेळी नोंदवण्यात आले होते. या निर्णयाला अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले.

जरांगे यांच्या काही माजी सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. संबंधितांची ही टीका एका विशिष्ट जातीसमूहाला खूश करण्यासाठी असल्याचा आरोप जरांगे यांनी आपल्या भाषणात केला होता. यावेळी त्यांनी एका घटकाचा वेगळ्या अर्थाने उल्लेख केल्यामुळे भावना दुखावल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. आता या प्रकरणी पुराव्यांसह पुढील कायदेशीर कार्यवाही होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही