Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.
अशात राज्य सरकारने सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज नॅशनल रिसर्च फेलोशिपच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. शासनाने मराठा समाजावर मोठा अन्याय केला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
The government has reduced the funds of Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship
ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “‘सारथी’च्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शाहू महाराज नॅशनल रिसर्च फेलोशिप’च्या निधीत शासनाने कपात केली आहे.
यावर्षी हि फेलोशीप केवळ ५० पात्र विद्यार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. यापूर्वी हीच फेलोशिप ८५१ विद्यार्थ्यांना देण्यात येत असे. शासनाने फेलोंच्या संख्येत मोठी कपात करुन मराठा समाजावर मोठा अन्याय केला आहे.
यासोबतच बार्टी, महाज्योती यांच्या आणि टीआरटीआय फेलोंची संख्याही कमी केली आहे. बार्टीच्या माध्यमातून यापुर्वी ८६१, महाज्योतीच्या माध्यमातून १२५० तर टीआरटीआयच्या माध्यमातून १४६ जणांना फेलोशीप दिली जायची. आता हि संख्या बार्टीसाठी २००, महाज्योतीसाठी ५० तर टीआरटीआय साठी १०० इतकी कमी केली आहे.
शासनाची ही कृती होतकरु आणि गरीब विद्यार्थ्यांची संधी हिसकावून घेणारी आहे. विशेषतः याबाबत विद्यार्थी सातत्याने मागणी करीत असतानाही शासन याला प्रतिसाद देत नाही ही मोठी खेदजनक बाब आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन ही फेलोशीप पुर्ववत करावी ही आमची देखील आग्रही मागणी आहे. शासनाने यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? रात्री उशिरा CM शिंदे आणि जरांगेंची फोनवर चर्चा
- Sanjay Raut | तुमचे आश्वासनाचे फुलबाजे विझले का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
- Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालन्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या
- Uddhav Thackeray | मिंधेंच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काही चाड उरली आहे का? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Abdul Sattar | उठाव करणारे फुगे नाही तर योद्धा आहे; अब्दुल सत्तारांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर