Share

Varsha Gaikwad | महायुतीचं ‘वरून कीर्तन, आतून तमाशा’; ‘त्या’ व्हिडिओवरून वर्षा गायकवाडांचं राज्य सरकार टीकास्त्र

🕒 1 min read Varsha Gaikwad | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Varsha Gaikwad | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महायुतीचं ‘वरून कीर्तन, आतून तमाशा’, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

The issue of Maratha reservation has been burning all over the state – Varsha Gaikwad

ट्विट करत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, “महायुतीचं ‘वरून कीर्तन, आतून तमाशा’. सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्व प्रकाराबद्दल किती गंभीर आहेत, ते समोर आलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत बोलण्याआधी या तिघांमध्ये सुरू असलेली चर्चा माईक सुरू राहिल्याने ऐकू आली. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांना याची जाणीव करून दिली.. वा, रे वा, शिंदे सरकार!”

या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे.

तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे.

आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.”

दरम्यान, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं, असं एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि पवारांना म्हटलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.

यावर पवारांनी यस यस अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर फडणवीस आणि माईक चालू असल्याची आठवण करून दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही