Share

Rohit Pawar | मराठा आरक्षणात सरकार राजकारण करतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून … Read more

Published On: 

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेतील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपण बोलून मोकळं व्हायचं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.

त्यावर अजित पवारांनी येस येस म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू असल्याची आठवण करून दिली.

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Someone is on hunger strike for the rights of a community – Rohit Pawar

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या त्या व्हिडिओचा आम्ही निषेध करतो. हा विषय फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला नाही.

कुणीतरी एका समाजाच्या हक्कासाठी उपोषणाला बसलं आहे. त्या व्यक्तीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि त्यावर तुम्ही फक्त बोलून मोकळं व्हायचं, असं तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्ही त्या गोष्टीचं राजकारण करत आहात. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर तुम्ही राजकारण करत असाल तर या सर्व गोष्टी जनतेच्या लक्षात येत आहे.”

दरम्यान, या व्हिडिओवर ओमराजे निंबाळकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे.

तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.

आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय”, असं ओमराजे निंबाळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही