Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन करत आहे.
उपोषणाच्या पंधराव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यामुळं मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागं घेतलं आहे. त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं असलं तरी पुढचा महिनाभर ते आंदोलन स्थळीच असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळाला भेट द्यावी असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज जरांगे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी दाखल होणार आहे.
संध्याकाळी पाच वाजता त्यांची ही भेट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना करणार आहे.
Sambhaji Bhide met Manoj Jarange
दरम्यान, 12 सप्टेंबर 2023 रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संभाजी भिडे यांना मनोज जरांगे यांचं आंदोलन गुंडाळण्याची सुपारी दिली असल्याचं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.
शरद कोळी यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने संभाजी भिडेंना सुपारी दिलीये; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
- Supriya Sule | शासनाने मराठा समाजावर मोठा अन्याय केलाय; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? रात्री उशिरा CM शिंदे आणि जरांगेंची फोनवर चर्चा
- Sanjay Raut | तुमचे आश्वासनाचे फुलबाजे विझले का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
- Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालन्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या