Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एका पत्रकार परिषदेतील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. आपण बोलून मोकळ व्हायचं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला अजित पवार येस येस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू असल्याची आठवण करून दिली आहे. हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही विरोधक लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Government is sensitive about Maratha reservation – Eknath Shinde
ट्विट करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे.
तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे.
आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | मराठा आरक्षणात सरकार राजकारण करतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका
- Eknath Shinde | मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज जरांगेंची घेणार भेट
- Maratha Reservation | मराठा आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने संभाजी भिडेंना सुपारी दिलीये; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
- Supriya Sule | शासनाने मराठा समाजावर मोठा अन्याय केलाय; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? रात्री उशिरा CM शिंदे आणि जरांगेंची फोनवर चर्चा