Deepak Kesarkar | मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. अशात आता या व्हिडिओवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Fadnavis government had brought Maratha reservation – Deepak Kesarkar
दीपक केसरकर म्हणाले, “बोलून मोकळं व्हायचं म्हणजे आपण निर्णय घ्यायचा. कोर्टात टिकेल असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी राज्य शासनाने वेळ मागून घेतला आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षण आणलं होतं.
त्यावेळी ते चौदा महिने टिकलं देखील होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडू शकले नव्हते. त्यामुळे आपण निर्णय घ्यायचा म्हणजे कोर्टात टिकेल, असा निर्णय घ्यायचा असा त्याचा अर्थ आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं.”
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हो हो म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू असल्याची आठवण करून दिली आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | संभाजी भिडे उपोषण स्थळी राज्य सरकारची वकिली करायला गेले – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | समाजाची दिशाभूल करणं सरकारला महागात पडेल – मनोज जरांगे
- Aditya Thackeray | हीच ती गद्दारी वृत्ती; ‘त्या’ व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना धारेवर धरलं
- Varsha Gaikwad | महायुतीचं ‘वरून कीर्तन, आतून तमाशा’; ‘त्या’ व्हिडिओवरून वर्षा गायकवाडांचं राज्य सरकार टीकास्त्र
- Eknath Shinde | काही विरोधक गैरसमज पसरवण्याचं काम करताय; ‘त्या’ व्हिडिओवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया