Vijay Wadettiwar | संभाजी भिडे उपोषण स्थळी राज्य सरकारची वकिली करायला गेले – विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या सोळा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजासाठी लढत आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आंदोलन स्थळी दाखल झाले होते.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे उपोषण स्थळी राज्य सरकारची वकिली करायला गेले होते, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Bhide Guruji went to that place to advocate the state government – Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्य सरकार तुमची फसवणूक करणार नाही, असं संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना म्हटलं आहे. राज्य सरकारवर विश्वास ठेवा, असं देखील भिडेंनी जरांगे यांना सांगितलं आहे.
शिष्यांनी गुरुजींवर आणि मग लोकांनी शिष्यांवर विश्वास ठेवावा, यासाठी संभाजी भिडे त्या ठिकाणी गेले होते. भिडे गुरुजी त्या ठिकाणी राज्य शासनाची वकिली करायला गेले होते. संभाजी भिडे सरकारसाठी सांगकाम्याचं काम करत आहे. हे लोकांनी आता बघितलं आहे.”
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मनोज जरांगे यांचं आंदोलन गुंडाळण्यासाठी संभाजी भिडे यांना सुपारी दिली आहे.
त्यामुळे संभाजी भिडे जालना जिल्ह्यात दाखल झाले होते. मनोज जरांगे गेल्या पंधरा दिवसापासून मराठा समाजासाठी आंदोलन करत आहे.
संभाजी भिडे यांना मराठा बांधवांची एवढी काळजी होती तर ते पंधरा दिवस कुठे गायब होते? त्या 15 दिवसांमध्ये त्यांना मराठा समाजाच्या भावना दिसल्या नाही का?”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | समाजाची दिशाभूल करणं सरकारला महागात पडेल – मनोज जरांगे
- Aditya Thackeray | हीच ती गद्दारी वृत्ती; ‘त्या’ व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना धारेवर धरलं
- Varsha Gaikwad | महायुतीचं ‘वरून कीर्तन, आतून तमाशा’; ‘त्या’ व्हिडिओवरून वर्षा गायकवाडांचं राज्य सरकार टीकास्त्र
- Eknath Shinde | काही विरोधक गैरसमज पसरवण्याचं काम करताय; ‘त्या’ व्हिडिओवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- Rohit Pawar | मराठा आरक्षणात सरकार राजकारण करतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका