Sanjay Raut | मुंबई: आज ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. आज दुपारी बारा वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) ही सुनावणी घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका केली आहे. राहुल नार्वेकर यांनी घटनाद्रोह केला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
An illegal government is currently working in Maharashtra – Sanjay Raut
आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर केलं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या बेकायदेशीर सरकार काम करत आहे.
या सरकारला कोणताही कायदेशीर आधार नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेत फूट पाडून हे सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 जण अपात्र ठरतील.
त्यानंतर अजित पवारांनी आपल्या काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली. त्यामुळे ते देखील अपात्र ठरणार आहे. हे आम्ही नाही तर या देशाची घटना सांगत आहे. घटनेतील 10 वं शेड्युल हे सांगत आहे.
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अनेक पक्ष बदलण्याचा अनुभव आहे. पक्षांतर करणं हा त्यांचा राजकीय धर्म आहे. ते अधिकारी चालढकल करत आहे. त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केला आहे.
एक वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार बसलं आहे. या सरकारने घेतलेल्या निर्णयातून भ्रष्टाचार निर्माण झाला आहे. तरी देखील राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानायला तयार नाही.
हे सर्व बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वर्गामध्ये अस्वस्थ झाले असतील. राहुल नार्वेकर यांना घटनेचं आणि कायद्याचं पालन करण्याची सुबुद्धी मिळू दे एवढेच मी सांगू शकतो.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही – मनोज जरांगे
- Uddhav Thackeray | मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झालेय; ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्त्र
- Deepak Kesarkar | बोलून मोकळ व्हायचं म्हणजे योग्य निर्णय घ्यायचा; व्हायरल व्हिडिओवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
- Vijay Wadettiwar | संभाजी भिडे उपोषण स्थळी राज्य सरकारची वकिली करायला गेले – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | समाजाची दिशाभूल करणं सरकारला महागात पडेल – मनोज जरांगे