Eknath Shinde | मनोज जरांगे अत्यंत भारी, आमरण उपोषण करणं सोपं नाही – एकनाथ शिंदे
Eknath Shinde | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 17 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे.
आज आंदोलनाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमरण उपोषण करणं सोपं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange is not fighting for himself but for society – Eknath Shinde
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “मी मनोज जरांगे यांच्या बाबांना सांगितलं आहे की तुमचा मुलगा अत्यंत भारी आहे. तो स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढत आहे. मनोज जरांगे यांनी स्वतःसाठी कधीच कोणते प्रश्न मांडले नाही.
जेव्हा जेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी मराठा समाजाबद्दलच मागणी केली आहे. यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमरण उपोषण करणं सोपं नाही.
जरांगे यांनी आमरण उपोषण केलं आणि ते जिद्दीने पुढे नेलं आहे. त्यांचा हेतू आणि मागणी अत्यंत प्रामाणिक आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मी त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. त्यांनी माझ्या मागणीचा मान राखत माझ्या हाताने ज्यूस घेतला आहे.”
पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सरकारने यापूर्वी मराठा समाजाला 16 आणि 17 टक्के आरक्षण दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने कायदा केला आणि ते आरक्षण रद्द झालं.
हे आरक्षण का रद्द झालं? याबाबत मनोज जरांगे यांना माहित आहे. त्यामुळे मी यावर बोलणार नाही. पण आम्ही आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होणार? CM शिंदेंच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण सोडलं
- Sanjay Raut | राहुल नार्वेकरांनी घटनेशीद्रोह केलाय – संजय राऊत
- Maratha Reservation | आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही – मनोज जरांगे
- Uddhav Thackeray | मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झालेय; ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्त्र
- Deepak Kesarkar | बोलून मोकळ व्हायचं म्हणजे योग्य निर्णय घ्यायचा; व्हायरल व्हिडिओवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया