Rahul Narwekar | मुंबई: आज शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सुनावणी घेतली आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांनी एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करावं, असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.
MLAs are going to the village as Ganesh festival is coming
गणेश उत्सव आल्याने आमदार गावाकडे जात आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतली आहे. शिंदे गटाच्या आमदारांची ही मागणी मंजूर झालेली असून विधानसभा अध्यक्षांनी (Rahul Narwekar) त्यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.
त्याचबरोबर त्यांनी आजपासून दोन आठवड्यात रिप्लाय फाईल करण्याचे निर्देश देखील दिले आहे. दोन आठवड्यात फाईल एक्सचेंज करा, असं विधानसभा अध्यक्ष यांनी शिंदे गटाला सांगितलं आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. राहुल नार्वेकर यांना अनेक पक्ष बदलण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर पक्षांतर करणे हा त्यांचा राजकीय धर्म आहे.
ते अधिकारी चालढकल करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केला आहे. राज्यामध्ये एका वर्षापासून घटनाबाह्य सरकार आहे.
या सरकारने घेतलेल्या निर्णयामधून भ्रष्टाचार निर्माण होताना दिसत आहे. एवढं सगळं होऊन देखील राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानायला तयार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी उपोषण सोडायला उशीर झालाय – विजय वडेट्टीवार
- Nitesh Rane | रोहित पवार आत्ताशी ‘सिनियर केजी’त – नितेश राणे
- Dilip Walse Patil | अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत जरांगेंच्या भेटीला का नाही गेले? दिलीप वळसे पाटील म्हणतात…
- Eknath Shinde | मनोज जरांगे अत्यंत भारी, आमरण उपोषण करणं सोपं नाही – एकनाथ शिंदे
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होणार? CM शिंदेंच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण सोडलं