Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं गेल्या 17 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपोषण स्थळी दाखल होऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट होताच जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Our government is working hard for the welfare of the Maratha community – Devendra Fadnavis
ट्विट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे.
मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.
मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे.
भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | व्हायरल व्हिडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Rahul Narwekar | आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी
- Vijay Wadettiwar | जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी उपोषण सोडायला उशीर झालाय – विजय वडेट्टीवार
- Nitesh Rane | रोहित पवार आत्ताशी ‘सिनियर केजी’त – नितेश राणे
- Dilip Walse Patil | अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत जरांगेंच्या भेटीला का नाही गेले? दिलीप वळसे पाटील म्हणतात…