Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये यावर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, तरी देखील राज्य सरकारने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय, असं म्हणतं विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
The government has not restructured the debt – Vijay Wadettiwar
ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय. कर्नाटक मधील काँग्रेस सरकार आज १९५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार आहे.
इकडे महाराष्ट्रात मात्र सरकार बेधुंद वागतंय. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. मग, महाराष्ट्र सरकार काय करतंय ? जनतेच सरकार म्हणून थापा मारणारे मुख्यमंत्री निष्क्रिय बसून आहे.
अर्धे उपमुख्यमंत्री नुकतेच जपान फिरून आले आणि आता राजस्थान निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. अर्धे उपमुख्यमंत्री त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या खात्यांच्या बैठका घेऊन स्वतःच्या आमदारांसाठी निधी पळवण्यात व्यस्त आहे.
दुष्काळाने शेतकरी होरपळतोय त्याच्याकडे सरकारचं लक्ष कधी जाणार? सत्तेत बसून स्वतःची कामे करून घेण्याच्या नादात या सरकारने शेतकऱ्यांचा डब्बा आता सोडला असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जो व्यक्ती समाजासाठी काम करत आहे, त्यांच्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं आहे. परंतु, त्याला आता अत्यंत उशीर झाला आहे. जरांगे यांचं उपोषण सोडवण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती.
त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी देखील शासनाची आहे. सरकारने लवकरात लवकर आपली जबाबदारी पार पाडायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | दिल्लीत मनोज जरांगेंच्या नावाची चर्चा; CM शिंदे म्हणतात…
- Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या कल्याणासाठी आमचं सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | व्हायरल व्हिडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Rahul Narwekar | आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी
- Vijay Wadettiwar | जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी उपोषण सोडायला उशीर झालाय – विजय वडेट्टीवार