Ajit Pawar | पुणे: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवार यांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
I am being trolled in this without any reason – Ajit Pawar
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आपण एकदम गैरसमज करून घेऊ नका. माझा काही रोल नसताना यामध्ये मला ट्रोल केलं जात आहे.
काल देखील मी दिवसभरात मंत्रालयात काम करत होतो. राज्यात विविध विभागात एक लाख पन्नास हजार मुला-मुलींची भरती चालू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटू लागल्या आहे.
त्यामुळे ते सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहे. मागच्या सरकारमध्ये शिक्षण भरतीत काय झालं, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे.
पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “सध्या आम्हाला बदनाम करायचं काम सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींचे काय प्रश्न आहे, हे आम्हाला चांगल्या प्रकारे कळतात.
कारण गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात काम करत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच दीड लाख तरुण-तरुणींची भरती आम्ही आयोजित केली आहे. त्याचबरोबर माझं तरुण-तरुणींना आवाहन आहे की आमच्यावर जे टीका करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.”
दरम्यान, रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले.
याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?”
“सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत.
केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | दिल्लीत मनोज जरांगेंच्या नावाची चर्चा; CM शिंदे म्हणतात…
- Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या कल्याणासाठी आमचं सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | व्हायरल व्हिडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Rahul Narwekar | आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी