Share

‘शिक्षण आणि नाती कधी विसरू नका’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मोदींचा खास सल्ला

IIT दिल्ली दीक्षांत समारंभ पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ‘जो शिकेल, तोच जिंकेल’ हा यशाचा मंत्र देत कॅम्पस, शिक्षक आणि मैत्री जपण्याचा सल्ला दिला.

Published On: 

PM Modi addressing IIT Delhi convocation students

IIT Delhi Convocation : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी ५८७ पीएचडी (Ph.D.) संशोधकांसह पदवी प्राप्त करणाऱ्या ३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना संबोधित केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, ते त्यांच्या आयुष्यातील खरोखरच अविस्मरणीय क्षण अनुभवत आहेत. त्यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीमुळे यापूर्वी त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद व्हर्च्युअल माध्यमातून झाला होता. या प्रसंगी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा मंत्र दिला. “जो शिकेल, तोच जिंकेल” या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

“येथील अनेक मित्र कदाचित त्यांच्या पहिल्या स्टार्टअपचे स्वप्न पाहत असतील, तर काही जण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येकाचे स्वप्न अद्वितीय आहे. तरीही, प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट समान आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

PM Modi addressing IIT Delhi convocation students

“IIT दिल्लीतील तुमचा पहिला दिवस आठवा आणि आजच्या दिवसाचाही विचार करा. ओरिएंटेशन (परिचय सत्र) कालच झाल्यासारखे वाटते आणि आता दीक्षांत समारंभ होत आहे. तुमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाबद्दल तुम्हाला नक्कीच समाधान आणि उत्साह वाटत असेल. या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या,” असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.

“भविष्यात, जसजशी तुमची जबाबदारी वाढेल, तसतसे या ठिकाणच्या आठवणी तुम्हाला भूतकाळात घेऊन जातील आणि तुम्हाला ऊर्जा देतील. कुमाऊ, आरा, कारा… बिंडी, नील, कैलास, हिमाद्री, इंटर हॉस्टेल कॉम्पिटेशनचे किस्से, जुने तंटे अशा अनेक गोष्टी असतील. येथून बाहेर पडताना या आठवणींकडे मागे वळून पहा. हा केवळ शिक्षणाचा विषय नाही,” असे मोदी म्हणाले.

मित्रांनो, या भावूक क्षणी मी एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगेल, जेव्हा जेव्हा जीवन तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा लक्षात ठेवा की ही कॅम्पस लाईफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमचं कुटुंब बनले. तुमच्या प्राध्यापकांनी तुम्हाला घडवले. हे कॅम्पस हळूहळू तुमचे घर बनले. तुम्ही मिळवलेल्या प्रत्येक यशात त्या सर्वांची आठवण ठेवा, असे ते म्हणाले.

त्या सर्वांबद्दल कृतज्ञ राहा. हे अनुभव तुमच्यासोबत ठेवा, त्यांना विसरू नका. त्यांना सोबत घेऊन जा. माझा सल्ला आहे की, येथून जाण्यापूर्वी तुम्ही एकमेकांना भेटावे. मोदींनी असाही सल्ला दिला की, तुम्ही जिथे कुठे जाल, तिथे हे नाते कायम टिकून राहील याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही