Prithvi Shaw | पृथ्वी शॉसारख्या खेळाडूंना संधी का मिळत नाही?, जय शाहच्या ट्विटवर चाहत्यांनी उपस्थित केला प्रश्न

Prithvi Shaw | टीम महाराष्ट्र देशा: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) टीम इंडियातून बाहेर असला, तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. नुकतच त्याने आसामविरुद्ध झालेल्या रणजी सामन्यात मुंबईकडून विक्रमी खेळी खेळली. या सामन्यामध्ये पृथ्वीने 369 धावांचा टप्पा गाठला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील भारतीय क्रिकेटपटूची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्याच्या या खेळीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे. त्यानंतर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहे.

जय शाह ट्विट करत म्हणाले, “रेकॉर्ड बुकमध्ये आणखी एक मोठी नोंद झाली आहे. पृथ्वी शॉची ही एक अप्रतिम खेळी आहे. रणजी ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंतची सर्वोत्तम दुसरी धावसंख्या केल्याबद्दल त्याचे अभिनंदन. आम्हाला तुझा अभिमान आहे.” जय शहा यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

पृथ्वी शॉ इतका चांगला खेळत आहे, तर त्याला टीम इंडियामध्ये पुन्हा प्रवेश का मिळत नाही? असा सवाल नेटकऱ्यांनी जय शहा यांच्या ट्विटवर उपस्थित केला आहे. के. एल. राहुलला वारंवार अपयश मिळूनही त्याला संघात संधी दिली जात आहे. मात्र, पृथ्वी शॉ आणि ईशान किशन यासारख्या खेळाडूंना उत्तम कामगिरी करूनही संघाची स्थान मिळत नाही, असं देखील नेटकरी म्हणाले आहेत.

जय शाह यांच्या ट्विटवरील कमेंट्स

@ShreySanghvi3
@dhiraj907

Proud of you Prithvi Jay sir please give opportunities to young guys in team india and ask KL rahul to perform in Domestic

2021 मध्ये पृथ्वी शॉने भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियापासून दूर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघामध्ये संधी मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.