Chitra Wagh | “संजय राठोडांना क्लीनचीट का दिली? हे उद्धव ठाकरेंना विचारा”- चित्रा वाघ

Chitra Wagh | मुंबई :  राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

“ज्यावेळी रस्त्यावरील लढाईची गरज होती. त्यावेळी संजय राठोडांच्या विरोधात मी लढले. आता न्यायालयात मी गेली आहे. न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही, ते तुम्ही कधीही तपासू शकता. दुसरी गोष्ट त्यांना मंत्री करत असताना माझी जी भूमिका आहे, ती मी मांडलेली आहे. माझी लढाई संपलेली नाही, हे तेव्हाही बोलले मी आणि आजही बोलते आहे. तिसरी गोष्ट यामध्ये मंत्रिपद यासाठी दिले, कारण त्यांना क्लिनचीट दिली आहे. आता क्लीनचिट कोणी दिली? आमचे सरकार तर आता आले आहे”, असे चित्रा वाघ ( Chitra Wagh VS Sanjay Rathod ) म्हणाल्या आहेत.

“हे तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहात, याचे उत्तर तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Give Clean Chit ) यांना विचारलं पाहिजे. त्यावेळचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांना विचारलं पाहिजे. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता जे आजही सेवेमध्ये आहेत त्यांना विचारलं पाहिजे, की बाबानों तुम्ही तिघांनी काय म्हणून या संजय राठोडला क्लीनचिट दिली? तुम्ही क्लिनचीट दिली म्हणून या सरकारने त्यांना मंत्री बनवले. तरीही माझा विरोध कायम आहे.” असेही चित्रा वाघ Chitra Wagh यावेळी म्हणाल्या आहेत.

“ज्यावेळी रस्त्यावरील लढाई लढायची होती त्यावेळी लढले. आता न्यायालयीन प्रकरण आहे आणि माझा न्यायालयावर विश्वास आहे. मी असं म्हणणाऱ्यामधील नाही की माझ्या बाजूने निकाल दिला तर माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि नाही दिला तर हे पण सरकारच्या दावणीला बांधलं का? असं म्हणणाऱ्यामधील मी नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की यामध्ये मला न्याय मिळेल आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मी खरं बोलते की खोटं हे तुम्ही तपासू शकता आणि त्यावर तुम्ही मला शंभर प्रश्न विचारू शकतात.” असेही चित्रा वाघ ( Chitra Wagh VS Sanjay Rathod )  यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :