Urfi Javed | “उर्फी जावेदवर हल्ला झाला तर त्याला…”; चित्रा वाघ यांचं नाव घेत वकिलांनी दिला इशारा 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाने नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद अद्याप संपलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं. उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीवरून चित्रा वाघ आणि महिला आयोग यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता.

अशातच आता उर्फी जावेदच्या जीवाला काहीही झालं तरी त्याला चित्रा वाघच जबाबदार असल्याचे उर्फीच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यामुळे उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. उर्फी जावेद ही अभिनेत्री असल्याने ती तिच्या स्टाईलप्रमाणे राहते. त्यामुळे ती ज्या पद्धती प्रमाणे कपडे वापरते. त्या कपड्यांमुळे कुठेही अश्लिलता निर्माण होत नसल्याचे स्पष्टीकरण वकील नितीन सातपुते यांनी दिले.

चित्रा वाघ यांच्याकडून सर्वांसमोर अशी धमकीची वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची कोणीही अनुकरण केले आणि त्यामध्ये जर उर्फी जावेदवर हल्ला झाला तर त्याला जबाबदार या चित्रा वाघच असणार आहेत. त्यामुळे नितीन सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, उर्फी जावेद (Urfi Javed) ने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.

महत्वाच्या बातम्या :