Shubhangi Patil | सत्यजित तांबेंना शुभांगी पाटलांचं आव्हान; म्हणाल्या, “अब राजा का बेटा राजी नही बनेगा…”; 

Shubhangi Patil | मुंबईः नाशिक पदवीधर निवडणुकीत एका पाठोपाठ एक ट्विस्ट समोर येत आहेत. अशातच आज अखेर महाविकास आघाडी (MVA)तर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर मातोश्रीवर बैठक बोलावण्यात होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) नेते सुभाष देसाई व नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया देत सत्यजित तांबे यांना आव्हान दिल आहे.

“अब राजा का बेटा राजी नही बनेगा… काम करेल त्यालाच जनता निवडून देईल”, अशा शब्दात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी सत्यजित तांबे यांना आव्हान दिलंय. निवडणूक अर्ज भरताना मला पक्षाच्या वतीने एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं.

“पदवीधर उमेदवारांसाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देतेय. तर 45 ते 50 हजार भावांना घेऊन मी आझाद मैदानावर 6 दिवस अन्न व जलत्याग आंदोलन केलंय. त्यामुळे माझ्या कामासाठी मला तरुण निवडून देतील”, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने शुभांगी पाटील यांची ताकद वाढली असून सत्यजित तांबे यांच्यासमोर शुभांगी पाटील कितपत मैदान गाठू शकतील?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.