Share

Jagdish Mulik | “किती नेते आले-गेले, पण छ. संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही उपाधी..”; भाजपची अजित पवारांवर सडकून टीका

🕒 1 min read Jagdish Mulik | पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. “किती नेते आले-गेले. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही उपाधी कोणी पुसू शकला नाही आणि पुसू शकणार नाही”, असे म्हणत जगदीश मुळीक यांनी अजित पवार यांच्यावर टीका … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jagdish Mulik | पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. “किती नेते आले-गेले. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही उपाधी कोणी पुसू शकला नाही आणि पुसू शकणार नाही”, असे म्हणत जगदीश मुळीक यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

“देश आणि धर्मासाठी बलिदान दिलेल्या संभाजी महाराजांचे स्मरण येणाऱ्या पिढ्यांना होण्यासाठीच गोल्फ चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूल असे नाव दिले आहे. पुण्यात कोणी ‘दादागिरी’ करू पाहात असेल, तर ती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मोडून काढतील”, असेही जगदीश मुळीक यांनी यावेळी सांगितले.

“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. स्वराज्यरक्षक होते”, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात केले होते. त्यावरून वाद निर्माण होऊन राज्यभर अजित पवारांच्या विरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. “संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणणार”, हे अजित पवारांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

“दररोज रस्त्याने जाता-येता संभाजी महाराजांचे नाव दिसावे. तसेच येणाऱ्या नव्या पिढीला देश आणि धर्मासाठी संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण राहावी, म्हणूनच येरवडा येथील गोल्फ चौकाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पूलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असे नाव दिले आहे”, असे जगदीश मुळीक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

India Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या