Share

Amit Shah | अमित शहांनी संक्रांतीच्या निमित्ताने लुटला पतंगबाजीचा आनंद

🕒 1 min readAmit Shah | नवी दिल्ली :  देशभरात आज संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये संक्रांत असल्याने पतंग उडवण्यास सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्यासह पतंगबाजीचा आनंद लुटला आहे. अमित शहा यांनी गुजरातमधल्या अहमदाबाद या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Amit Shah | नवी दिल्ली :  देशभरात आज संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये संक्रांत असल्याने पतंग उडवण्यास सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्यासह पतंगबाजीचा आनंद लुटला आहे.

अमित शहा यांनी गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केला होता. या पतंग महोत्सवात सहभागी होत अमित शहा यांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. अमित शहा यांचे पतंगबाजीतले डावपेचही या निमित्ताने उपस्थितांना पाहण्यास मिळाले. यावेळी त्यांच्या पत्नीदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.

https://twitter.com/AmitShah/status/1614220206783725568?s=20&t=xA7hQV7GZkuA2ZlnRZFrkQ

पतंग उत्सवात येण्याआधी अमित शहा यांनी जगन्नाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासह दरियापूर या ठिकाणीही पतंग उडवताना पाहायला मिळाले आहे. दरवर्षी मकरसंक्रांत हा सण अमित शहात्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन साजरा करतात.

अमित शहा आजही विविध ठिकाणी गेले होते. या कार्यकर्त्यांसोबतही अमित शहा यांनी पतंग उडवला. लहान मुलं असतील किंवा तरूण असतील प्रत्येकजण पतंग उडवण्यात सहभागी झालेला पाहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या