Share

Supriya Sule | साडीने घेतला पेट, थोड्याने बचावल्या सुप्रिया सुळे

Supriya Sule | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यामध्ये घडली. हिंजवडी येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना ही घटना घडली. या घटनेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही.

हिंजेवाडीमध्ये कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. या प्रकरणामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. साडीला आग लागल्यानंतर त्यांनी त्यांचा दैनंदिन कार्यक्रम याच साडीमध्ये सुरू ठेवला आहे.

या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते फक्त दुर्दैव होतं बाकी काही नाही. मी थोडक्यात वाचले. आम्ही सगळे मुळशीला कराटे प्रशिक्षक केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. तिथे एक मेणबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीला आग लागली. साडीला आग लागली आहे, हे आमच्या लगेच लक्षात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर माझे सलग कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला मला वेळ मिळाला नाही.”

पुणे येथील मुळशी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन करताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. साडीला आग लागली आहे, ही बाब लक्षात येतच त्यांनी लगेच आग विजवली. सुदैवाने सुप्रिया सुळे यांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या

Supriya Sule | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यामध्ये घडली. हिंजवडी …

पुढे वाचा

Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now