Share

IND vs SL | “हे कोण बनेगा करोडपती…” ; रोहितच्या निर्णयावर अश्विनची प्रतिक्रया

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा म्हणजेच शेवटचा सामना सुरू आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. टीम इंडियाने या मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाविरुद्ध नॉन स्ट्राइक रन आऊट मागे घेतली होती. रोहित शर्माची ही उदारता टीम इंडियाचा फिरकी मास्टर म्हणजेच रविचंद्र अश्विन (R Ashwin) याला आवडली नाही. अश्विनने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर अश्विन प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाला, “शनाका जेव्हा ९८ धावांवर खेळत होतात त्यावेळी शमीने नॉन स्ट्राइक रन आउट करत पंचाकडे अपिल केली होती. मात्र, यावेळी रोहित शर्माने उदार मनाने ही अपिल मागे घेतली. त्यानंतर अनेकांनी याबद्दल ट्विट करायला सुरुवात केली. पण मी पुन्हा स्पष्ट करतोय की, ही फलंदाजाला बाद करण्याची एक योग्य पद्धत आहे. LBW किंवा झेलबाद आहे की नाही, हे विचारण्यासाठी कुणीही कर्णधाराला कोण बनेगा करोडपतीमधील अमिताभ बच्चनसारखे प्रश्न विचारणार नाही की तो खरच बाद आहे की नाही?.”

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना सुरू असताना शेवटच्या षटकामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका 98 धावांवर खेळत होता. तो शतकापासून फक्त दोन धावा दूर असताना मोहम्मद शमीने त्याला नॉन स्ट्राइकर एन्डवर धावबाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपली अपिल मागे घेतली होती. त्यामुळे श्रीलंकेचा कर्णधार आपले शतक पूर्ण करू शकला.

महत्वाच्या बातम्या

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा म्हणजेच …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now