Share

Sanjay Raut | “देशात अजूनही न्याय जिवंत, सत्याचाच विजय”; दोन्ही युक्तीवादानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे गटाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“देशात अजूनही न्याय जिवंत”

“सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अजूनही या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदसदविवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत. म्हणून न्यायालय जिवंत आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. हेच या महाराष्ट्राचं सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“हा निकाल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा”

“शिवसेना कोणती खरी आणि कोणती खोटी हे जनता ठरवेल. उद्या न्यायालयाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे निर्देश तरी आमची तयारी आहे. हा निकाल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि हा निकाल देशासाठी दिशादर्शक ठरावा हीच आमची भूमिका आहे”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“यांच्यात हा आत्मविश्वास येतो कुठून?”

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाचे नेते वारंवार सांगतात की निकाल आमच्याच बाजुने लागेल. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्या स्पष्ट सांगितलं की निकाल आपल्या बाजुने लागेल. याच्यात हा आत्मविश्वास येतो कुठून? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Raut | मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे गटाने दोन्ही …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now