मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एक रंगतदार प्रसंग पाहायला मिळाला. दिल्लीच्या करुण नायरने जसप्रीत बुमराहच्या षटकांत २९ धावा चोपत जोरदार हल्ला चढवला. या आक्रमक खेळीनंतर बुमराह आणि करुण यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
घटनेच्या वेळी कर्णधार हार्दिक पांड्याने तात्काळ हस्तक्षेप करत करुणला बाजूला नेले. दुसरीकडे, रोहित शर्माने दूर उभा राहून संपूर्ण प्रसंग पाहात मजेशीर रिअॅक्शन दिली.
Rohit Sharma viral reaction to Karun, Bumrah exchange
सामन्यात दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर जॅक फ्रेझर-मॅकगर्कला बाद केलं. मात्र, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या करुण नायरने दिल्लीसाठी निर्णायक खेळी साकारली. बुमराहच्या षटकांत त्याने एकामागून एक फटकेबाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
करुणने अवघ्या २२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि अखेर ४० चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह ८९ धावा करत बाद झाला. या सामन्यामुळे केवळ खेळच नव्हे तर मैदानावरील आक्रमकतेची देखील चर्चा रंगली आहे.
Karun Nair and Jasprit Bumrah were involved in a heated exchange during the DC vs MI match in IPL 2025 on April 13.
महत्वाच्या बातम्या
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका