Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणामुळे वाल्मिक कराड (Walmik Karad) पुरता अडकला आहे. तसेच कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने ते देखील याप्रकरणी अडकले आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी चांगलीच लावून धरली आहे.
राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. “जर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी माझा राजीनामा मागितला तर मी लगेचच राजीनामा देईन. सध्या सुरु असणाऱ्या गदरोळामध्ये काही वेगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत,” असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. (Dhananjay Munde resignation)
यावर आता मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर माध्यमांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता, “मी काहीच पाहत नाही, मी तुमचं ऐकूण घेते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय बोलू?” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Pankaja Munde on Dhananjay Munde resignation
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विधानावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरी पंकजा मुंडे यांनी माध्यमांना उत्तर देणे टाळले असले तरी वरिष्ठ जो निर्णय घ्यायचा तो घेणारच. जर वरिष्ठांन्नी मुंडेंचा राजीनामा मागितला तर याचा परिणाम त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :