Suresh Dhas । भाजपचे आमदार सुरेश धस हे सतत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी नवनवीन खुलासे करत असतात. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ते अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पालकमंत्री यांनी पद भाड्यानं दिलं तेव्हा मोठ्या प्रमाणात बोगस बिले उचलली. संजय मुंडे असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचां प्रभारी चार्ज देऊन बिलं उचलण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजना 2021-22अंतर्गत परळी आणि आंबेजोगाई कामे न करता एकूण 37 कोटीची 70 लाख रुपयांचं बिलं उचलले,” असा गंभीर आरोप धस यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “सार्वजनिक बांधकाम विभागात काम न करता नऊ कामाचे १३ कोटी बोगास बिले दिली गेली. अर्थ संकल्पामध्ये परळी पुस बर्दापुर काम न करता बिलं उचलली. क्षेत्रीय अधिकारी यांनी पाहणी केली असता एकाच कामाचे दोन वेळा बिल उचली असल्याचं समोर आलं होतं. 25/3/2020 मध्ये 57 कामाच्या प्रशासकीय मान्यता रद्द करत 14 कोटीचे बिले उचलली. 13/12/2021 ते 31/3/2022 कालावधीत परळी मतदारसंघात 73 कोटी 36 लाख बिले पालकमंत्री आणि सामजिक न्यायमंत्री असताना घेतली आहेत,” असा दावा धस यांनी केला आहे.
Suresh Dhas on Dhananjay Munde
दरम्यान, सुरेश धस यांच्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मुंडेंचे समर्थन करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :