बीड। संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बीड दौऱ्यावर आहेत. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोरच अजित पवारांनी एक इशारा दिला आहे.
“आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका (Macoca) लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar warn about Macoca
दरम्यान, काल धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुंडेंच्या राजीनामा घेतात का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या :