Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे वाल्मिक कराड हा चांगलाच अडचणीत सापडला आहे. दररोज त्याचे कारनामे समोर येत आहेत. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
अशातच आता वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वाल्मिक कराडच्या वाइन शॉपसाठी (Walmik Karad wine shop) केज नगरपंचायतीने अवघ्या चारच दिवसांत ना-हरकत प्रमाणपत्र दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडची केजमध्ये जागा नव्हती. असे असले तरी कराडने ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागील वर्षी 28 नोव्हेंबरला अर्ज केला होता. अर्ज करताच कराडला प्रमाणपत्र मिळाले. कराडवर भरमसाठ गुन्ह्यांची नोंद असताना त्याला परवाना कसा मिळाला? असा प्रश्न केला जात आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना वाल्मिक कराड याला प्रमाणपत्र दिल्याने केज नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आता केज नगरपंचायत काय स्पष्टीकरण देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Walmik Karad Wine Shop License
दरम्यान, सध्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) खुनाचा गुन्हा दाखल होतो का? याकडेही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवं वळण? अमित शाहांची भेट घेत Supriya Sule करणार मोठी मागणी
- मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या Suresh Dhas आणि प्रकाश सोळंकेंना Ajit Pawar यांचा पहिला धक्का! जिल्हा नियोजन समितीमधून काढलं
- Dhananjay Munde यांच्यासमोरच Ajit Pawar यांनी दिला इशारा, म्हणाले; “… तर मकोका लावून टोकाची भूमिका घेईन”