Share

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवं वळण? अमित शाहांची भेट घेत Supriya Sule करणार मोठी मागणी

by MHD
Supriya Sule will meet Amit Shah in Santosh Deshmukh murder case

Supriya Sule । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. विरोधक अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेदेखील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

“संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी न्याय द्यावा. मागील 51 दिवसांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? मी हा विषय पार्लमेंटमध्ये मांडणार आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंटमध्ये न्याय मागणार आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “याप्रकरणी दिल्लीत अमित शाह, भाजप खासदार आणि शिंदे गटाच्या खासदारांची भेट घेणार घेऊन त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार आहे. धनंजय मुंडेंचा नैतिकतेवर राजीनामा झाला पाहिजे,” अशीही मागणी सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule will meet Amit Shah

एकंदरीतच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी त्यांचे कुटुंब राज्याच्या विविध ठिकाणी मोर्चे काढत आहेत. अशातच आता अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Amit Shah is going to meet Supriya Sule in Delhi regarding the murder of Santosh Deshmukh. Everyone’s attention has been drawn to this meeting.

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now