Devendra Fadnavis । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय दबाव टाकला जात आहे, असे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे अजित पवारांनी ठोस पुरावा असल्याशिवाय कोणतीही कारवाई करणार नाही, असे संकेत दिले आहेत. अशातच यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“काल धनंजय मुंडे दिल्लीत आले होते. परंतु काल आमची भेट झाली नाही. आज सकाळीच आमची कॅबिनेटमध्ये भेट झाली. मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री असल्याने त्यांना भेटण्याची चोरी नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis on Dhananjay Munde
दरम्यान, यावरून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा विरोधक घेरू शकतात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरून कोणत्याही पुराव्याशिवाय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, हे निश्चित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका